Home गडचिरोली गडचिरोलीतील लांझेडा समोरील पुलियासमोर जखमी गाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ?

गडचिरोलीतील लांझेडा समोरील पुलियासमोर जखमी गाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ?

0
22

 

गडचिरोलीतील लांझेडा समोरील पुलियासमोर जखमी गाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ?

१२ तासांपासून तिव्र उष्णतेत जीव मुठीत धरून पडलेल्या मुक्या जनावराची दयनीय अवस्था

गडचिरोली : गडचिरोली शहराजवळील लांझेडा समोरील पुलिया परिसरात एका छोट्याशा गाईचा रात्री उशिरा अपघात झाला असून ती गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यालगत पडून आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेला जवळपास १२ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही त्या मुक्या जनावराच्या मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पुढे आली नसल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे.

भर उन्हात, तिव्र उष्णतेमध्ये आणि तहान-भुकेने व्याकुळ अवस्थेत ही गाय मदतीची वाट पाहत पडून असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. जखमी गाईची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून तिच्या अंगावर जखमा असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे प्राणीमात्रांविषयी समाजातील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्ते, संघटना तसेच नगर परिषद  संपर्क साधला.मात्र, अनेकांकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्ष मदतीसाठी मात्र कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“मुक्या जनावरांप्रती दया आणि संवेदनशीलता दाखविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास या निष्पाप जनावराचा जीव जाऊ शकतो,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी स्वतःहून पाणी व चारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र वैद्यकीय उपचाराशिवाय परिस्थिती गंभीर बनत चालल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, शहर व परिसरात विविध सामाजिक संस्था आणि प्राणी संरक्षणाच्या नावाने कार्य करणाऱ्या संघटना सक्रिय असल्याचे दिसून येते. मात्र प्रत्यक्ष मदतीची वेळ आल्यावर या संघटनांची उदासीनता समोर येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यामुळे “फक्त सोशल मीडियापुरतीच समाजसेवा का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासन, नगरपालिका व पशुवैद्यकीय विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन जखमी गाईवर उपचार करावेत, तसेच भविष्यात अशा घटनांमध्ये त्वरित मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुक्या जनावरांप्रती असलेली ही निष्काळजी वृत्ती थांबवून प्रशासनाने मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!