चंद्रपूर
तेलंगणा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांची आज पुण्यतिथी. पुण्यतिथी निमित्ताने हजारोच्या संख्येने आज भावीक धाबा गावात आले. भजनांचा सुरात गावातील प्रमुख मार्गाने पालखी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत बीआरएसचे नेते भूषन फुसे यांनी सहभाग घेतला.
कोंडय्या महाराज यांच्या महासमधीचे दर्शन घेतले. राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना त्यांनी परमहासा जवळ केली. महाराष्ट्र, विदर्भ,आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील भाविकांचे दैवत असलेल्या
संत परमहंस कोंडय्या महाराज यांचा पुण्यतिथी निमित्ताने आज गावात भक्तिमय वातावरण दिसून आले. भजनांच्या सुरात पालखी मिरवणूक निघाली. या पालखी मिरवणुकीत हजारो भक्तांनी सहभाग घेतला. गावातील प्रमुख मार्गांनी मिरवणूक फिरविल्या गेली. पालखीचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीत सहभागी झालेल्या भक्तांना अनेकांनी अल्पोहाराचे दान केलं. सायंकाळला भक्तांकडून महाप्रसाद वितरण होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात बीआरएसचे नेते भूषन फुसे सहभागी झाले होते.

