चंद्रपूर : तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या धाबा गोंडपिंपरी मार्गाचे काम पाच वर्षानंतर ही पूर्णत्वास गेलेल नाही. अतिशय संतगतीने सुरू असलेल्या या मार्गाचा प्रश्नाला घेऊन काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झालेत. आज ( मंगळवार ) धाबा- गोंडपिपरी मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ काँग्रेसने रास्तारोको आंदोलन केले.आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती.शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिनाभरात काम पूर्ण करू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
राज्याचा शेवटचा टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातून महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणारा राज्य मार्ग गेला आहे.या राज्यमार्गाचे भूमिपूजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भूमिपूजन होऊन पाच वर्ष झालेत मात्र मार्गाचे काम अपूर्णच आहे.या मार्गाने तेलंगणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील वीस गावातील नागरिक ये-जा करतात.मार्गावर मोठी वर्दळ असते.मार्गात अनेक ठिकाणी गिट्टी पसरविली आहे. अनेक ठिकाणी मार्ग खोदलेला आहे. यामुळे मार्गांवर अनेक अपघात झाले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाचा प्रश्न महत्त्वाचा असतानाही प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. राज्य मार्गावरील डोंगरगाव फाटाजवळ काँग्रेसने रास्तारोको आंदोलन केले. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस तैनात होते.गोंडपिपरीचे तहसीलदार बहाकर, बांधकाम विभागाचे अभियंते येडे, ठाणेदार नागलोत, सहारे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. महिन्याभरात काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते अभिजीत धोटे,गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे,निलेश संगमवार, देवेंद्र बट्टे, तुकेश वानोडे, विपीन पेद्दूरवार, सिन्नू कन्ननुरिवार,सचिन फुलझले,राजू झाडे,सोनी दिवसे,रेखा रामटेके,वनिता वाघाडे, नामदेव सांगडे, देविदास सातपुते, अशोक रेचंनकार,रामकृष्ण सांगडे, अनिल कोरडे,सारनाथ बक्षी उपस्थित होते.
मुख्य संपादक
- सुरज गुंडमवार
सह संपादक
- श्रीमंत सुरपाम
- सोमनाथ ऊईके
- मनोज उराडे

