चंद्रपूर
महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणाऱ्या गोंडपिपरी -पोडसा राज्यमार्गावरील धाबा -गोंडपिपरी मार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून संतगतीने सुरु आहे. अद्यापही काम पूर्णतःवास गेलेले नाही. या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. या मार्गाच्या प्रश्नाला घेऊन बीआरएसचे नेते भूषण फुसे आज ( सोमवार ) अनोखे आंदोलन करीत आहे. या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे हा मार्ग राजुरा विधानसभा क्षेत्रात येतो.
पाच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धाबा गोंडपिंपरी मार्गाचे भूमिपूजन केले. आज पाच वर्षे झाले तरी बारा कि.मी. अंतराच्या हा मार्ग अद्यापही पूर्णतवास गेलेला नाही. या मार्गावर अधून मधून अपघाताच्या घटना घडत असतात. अपघाताच्या घटना काहींना जीव गमावा लागला. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाला घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासना संदर्भात कमालीचा संताप जनतेत दिसून येत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी ठोस पाऊल उचलले नाही. अश्यात बीआरएसचे नेते भूषण फुसे या मार्गाचा प्रश्न घेऊन आज ( सोमवार ) आंदोलन करीत आहेत. धाबा बसस्थानक परिसरात हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने जनता सहभागी होणार असल्याचे फुसे यांनी सांगितले.

