Home local News ” भोंगळ ” चाळ्यांना नाट्यप्रेमी वैतागले :म्हणाले, गप्प बस रे..

” भोंगळ ” चाळ्यांना नाट्यप्रेमी वैतागले :म्हणाले, गप्प बस रे..

0
21

चंद्रपूर

आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून भुतानं झपाटल्यागत फिरणाऱ्या एका पार्सल नेत्याची मोठीच पंचाईत झाली. नाटकाच्या उद्घाटनासाठी पोहोचलेल्या या नेत्याने भाषण लांबलचक केलं. वैतागलेल्या नाटप्रेमींनी, आता थांबा, आम्हाला नाटक बघू द्या अश्या घोषणा केल्या. मंचावर असलेल्या राष्ट्रवादीच्या एका नेत्यांने या पार्सल नेत्याचे चिमटे काढले. घडलेल्या या प्रकारची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्राचा आमदार होण्याचे स्वप्न बघणारा पार्सल नेता गोंडपिपरी तालुक्यातील एका गावातील नाटकाच्या उद्घाटनासाठी गेला होता. स्वतःला आमदार समजणारा हा नेता वेळेवर पोहोचला नाही. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे नेते वाट बघत होते. उशिराने आलेल्या या नेत्यांनी भाषण ही लांबलचक केले. भाषणाला वैतागलेल्या नाटप्रेमींनी ” आता गप्प बसा आम्हाला नाटक बघू द्या ” अश्या घोषणा केल्यात. या घोषणांनी या पार्सल नेत्याच्या चेहराच पडला. या प्रकाराची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढले चिमटे…

नाटप्रेमीनो आम्ही तुमच्या अंत घेत आहोत. आम्ही सोमवारला स्टेजवर चढलो. आता थेट मंगळवारलाच उतरणार आहोत अश्या शब्दात या पार्सल नेत्याचे चिमटे काढले. मात्र तरी ही हा पार्सल नेता माईक सोडायला तयार नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!