चंद्रपूर
खरंतर कुठलही आंदोलन हे न्याय मिळविण्यासाठी असते. हल्ली मात्र आंदोलनाचा वापर केवळ दबाव टाकण्यासाठी होत आहे.बरं दबाव कश्यासाठी तर स्वतःच पोट भरण्यासाठी. गोंडपिपरी तालुक्यात काही राजकीय पक्षांनी आंदोलन केलीत. या आंदोलनातून काय मिळालं ? न्याय मिळण्याबाबत सामान्य माणसांचे हात रिकामेच राहिले.मात्र आंदोलनकर्त्यांची रिकामी झोळी भरल्या गेली. या आंदोलनाचे फलित काय ? तर काही नवे पर्यावरणवादी मिळाले. वन्यजीवप्रेमी, समाजसेवी मिळाले.हे आंदोलन जीवी मने आता निवडणुकीच्या रिंगणात उभे होणार आहेत. काहींनी तसा प्रयत्न केला होता. तोंडघशी पडलेत. ” नाचता येईना,अंगण वाकड ” अशी स्थिती असलेल्या या आंदोलन जीविना जनता पोटाशी घेणार काय? हे येत्या दिवसात कळणार आहे.
मागील वर्षभरात गोंडपिपरी तालुक्यात अनेक आंदोलन झालीत. या आंदोलनातून काय मिळालं हा अभ्यासाचा विषय. तालुक्यात एक चर्चा अशी ही आहे, ज्या प्रश्नांना घेऊन आंदोलन केल्या गेलं. ते प्रश्न जरी सुटल्या गेले नाहीत, तरी या आंदोलनाने काहींचे पोट मात्र भरल्या गेली. सामान्य नागरिकांच्या ज्या गाव नेत्यांवर विश्वास होता, त्या नेत्यांनी या विश्वासाचा बाजार केला. मध्यंतरी काहींना गोणपिपरीत वाढणाऱ्या प्रदूषणाची चिंता फारच भेडसावू लागली होती. त्यांनी निवेदन दिलेत. आंदोलन करण्याच्या इशारा दिला. हा विषय माध्यमातून फारच गाजला. अचानक यावरील आवाज शांत झाला. वाढलेले प्रदूषण कमी झालं. ज्या विरोधात आंदोलन केल्या गेलं ते आजही सुरूच आहे. मग विरोधाची धार का कमी झाली?
सुरजागडाच्या वाहतुकीचे प्रश्न गंभीर आहे. या वाहतुकीने अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे. अनेकांना जीव गमवा लागला. या वाहतुकीच्या विरोधात काहींनी धनुष्यबाण हातात घेतला. निशाना नेमका जागीच लागला. मात्र ज्या प्रश्नासाठी धनुष्यबाण हाती घेतला गेला.तो प्रश्न खरंच सुटलाय काय? प्रश्न कुणाचे सुटलेत?
खरंतर अशा आंदोलन जीवीपासून सामान्य जनतेने लांब राहायला हवं. आता हेच आंदोलन जीवी खुर्ची मिळवण्याची प्लॅनिंग करीत आहेत. अशा आंदोलन जीवीवर विश्वास ठेवण्यापेक्षा अन्यायकर्त्याच्या छाताडावर बसून विजयाची घोषणा करण्याची ताकद तुम्ही स्वतः आता निर्माण करायला हवी.

