चंद्रपूर
निवडणूक जवळ आली की नेते सक्रिय होतात. माध्यमात झळकण्यासाठी ते ” माकडचाळे ” करतात. दिवाळीच्या मोसम सुरू असल्याने ही नेते मंडळी स्नेहमिलनाचे कार्यक्रम करीत सुटली आहे. या कार्यक्रमात खरंच स्नेह असतो काय ? मिलनात स्वार्थ नकोच. खरंतर दिवाळी अंधार दूर करणारा सण. अंधार दूर करण्याचे काम जो तो आपल्या परीने करतो. त्यात काही गैर नाही. एव्हाना पांघरून ओडून कुंभकर्ण झोपेत असलेले नेते दिवाळीत सक्रिय होतात. माध्यम प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या स्नेह मिलनाचा कार्यक्रमाला याच दरम्यान उत येते.अश्या स्नेह मिलनातून वर्षभर त्यांच्यासाठी राबण्याचे वचन उपस्थितांकडून नेते घेत असतात. स्वार्थाचा चिखलात खोल खोल रुतलेल्या या स्नेह मिलनाचा फायदा नेते मोठ्या हुशारीने उचलतात.राजुरा विधानसभा क्षेत्रात सध्या स्नेह मिलनाला उत आला आहे. अश्या स्नेह मिलनाची भारीच चर्चा सुरू आहे. हे मिलन भविष्यात नेत्यांना किती फायदेशीर ठरेल हे बघणे रंजक ठरणार आहे.

