Home गडचिरोली नगराध्यक्षा प्रणोती निबोंरकर यांची प्रभारी जिल्हाधिकारी यांच्याकडे शहरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजनांची मागणी

नगराध्यक्षा प्रणोती निबोंरकर यांची प्रभारी जिल्हाधिकारी यांच्याकडे शहरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजनांची मागणी

0
23

नगराध्यक्षा प्रणोती निबोंरकर यांची प्रभारी जिल्हाधिकारी यांच्याकडे शहरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजनांची मागणी

गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्याबाबत प्रशासन सकारात्मक

प्रभारी जिल्हाधिकारी यांचे दोन दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन

शहरात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज प्रभारी कलेक्टर साहेबांसोबत सविस्तर व महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. नागरिकांना नियमित, पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात तात्काळ सोडण्यात यावे, जेणेकरून शहरातील जलसंकट कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. सध्या वाढत्या तापमानामुळे अनेक भागांत पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत दोन दिवसांत गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

शहरातील नागरिकांना दिलासा मिळावा आणि आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!