
माजी आमदार. डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून ‘नवी दिशा–नवा गडचिरोली’; २६ ऑगस्टला ‘विकसित गडचिरोली व्हिजन–२०४७’चे सादरीकरण
राजीव गांधी सभागृह, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे नागरिक, युवक व विविध क्षेत्रातील मान्यवरानां सहभागाचे आवाहन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘विकसित गडचिरोली व्हिजन–२०४७’ या संकल्पनेचे सादरीकरण व संबोधन बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली शहरातील राजीव गांधी सभागृह, इंदिरा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.
‘नवी दिशा–नवा संकल्प–नवा गडचिरोली’ या संकल्पनेतून जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक आराखडा मांडण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची समृद्ध नैसर्गिक व वनसंपदा तसेच आदिवासी संस्कृतीचा वारसा जपत शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, शेती, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांच्या माध्यमातून जिल्ह्याला आत्मनिर्भर, समृद्ध, सक्षम आणि विकसित करण्याचा संकल्प यावेळी मांडण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘आपल्या सर्वांच्या सहभागातून आत्मनिर्भर, समृद्ध, सक्षम आणि विकसित गडचिरोली–२०४७ घडवूया!’ या उद्देशाने या उपक्रमातून जिल्ह्याच्या विकासासाठी सामूहिक सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी, प्रदेशाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र तथा माजी आमदार, गडचिरोली विधानसभा, असून त्यांच्या संकल्पनेतून ‘विकसित गडचिरोली व्हिजन–२०४७’चा व्यापक विचार पुढे नेला जात आहे.
कार्यक्रमाची माहिती :
📅 दिनांक : २६ ऑगस्ट २०२६, बुधवार
⏰ वेळ : सकाळी ११ वाजता
📍 स्थळ : राजीव गांधी सभागृह, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली
गडचिरोलीच्या विकासाची नवी दिशा ठरविणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








