Home गडचिरोली आदिवासी जनसंवाद यात्रेदरम्यान भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी घेतले...

आदिवासी जनसंवाद यात्रेदरम्यान भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी घेतले माजी आमदार केशवराव मानकर यांचे आशीर्वाद

0
18

आदिवासी जनसंवाद यात्रेदरम्यान भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी घेतले माजी आमदार केशवराव मानकर यांचे आशीर्वाद

 

आमगांव – भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या आदिवासी जनसंवाद यात्रेदरम्यान आमगाव विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मा. केशवराव मानकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजयजी पुराम, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष गोंदिया ॲड. येशुलाल उपराडे, भाजपा जिल्हा महामंत्री मा. नरेंद्र बाजपेयी आदी मान्यवर उपस्थित होते.

भेटीदरम्यान आदिवासी समाजाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणी तसेच भाजपा पक्षाच्या आगामी कार्यक्रमांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. डॉ. देवराव होळी यांनी ज्येष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन व आशीर्वाद हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

मा. केशवराव मानकर यांनी डॉ. देवराव होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेस शुभेच्छा देत आदिवासी समाजाच्या विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!