Home गडचिरोली भाजपचा दणदणीत विजय; कुरखेड्यात जल्लोष – माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या...

भाजपचा दणदणीत विजय; कुरखेड्यात जल्लोष – माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय उत्सव

0
25

भाजपचा दणदणीत विजय; कुरखेड्यात जल्लोष – माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय उत्सव

कुरखेडा (प्रतिनिधी):
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बंगाल, आसाम आणि पाँडिचेरी येथे विरोधी पक्षाचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विशेषतः बंगालमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर आज कुरखेडा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषपूर्ण विजय उत्सव साजरा केला.
आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांच्या नेतृत्वात भारत किराणा, नगर पंचायत चौक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी भाजपा कार्यालय कुरखेडा येथून ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीसह भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “देश का नेता कैसा हो – नरेंद्र मोदी जैसा हो” तसेच “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला. डॉ. देवराव होळी यांनी यावेळी मार्गदर्शन करत भाजपाच्या विजयामागील संघटनशक्ती, कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास हेच मुख्य घटक असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळातही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, शहराध्यक्ष सागर निरंकारी, नगरसेवक रामभाऊ वैद्य, कृष्णा चंद्रमा, विवेक बुद्दे, देवानंद खुणे, प्रा. विनोद नागपूरकर, उल्हास देशमुख, जयश्री मडावी, रूपाली कावळे, कल्पना मांडवे, चित्रा गजभिये, सुनीता दखने, अहिल्या लोथे, सुषमा दहीकर, अंगरेज कराडे, सुखदेव कापगते, राजेश उईके, रुपचंद कापगते, विश्वनाथ बनसोड, मंगेश मांडवे, किशोर कराळे, विलास बनसोड, धर्मा दरवडे, नितीन कुथे, सुशील बेहार, तुषार कुथे, स्वप्निल खोब्रागडे, जगदीश कुंबरे, पुष्पराज रांहागडाले, अक्षय पारधी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!