Home गडचिरोली नागरिकांच्या हक्कासाठी नगराध्यक्ष अँड प्रणोती निबोंरकर थेट मैदानात;गुरुकुंज कॉलनी येथे थेट पाहणी!

नागरिकांच्या हक्कासाठी नगराध्यक्ष अँड प्रणोती निबोंरकर थेट मैदानात;गुरुकुंज कॉलनी येथे थेट पाहणी!

0
25

नागरिकांच्या हक्कासाठी नगराध्यक्ष अँड प्रणोती निबोंरकर थेट मैदानात;गुरुकुंज कॉलनी येथे थेट पाहणी!

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

गडचिरोली : प्रभाग क्र. २ येथील गुरुकुंज कॉलनीमध्ये वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांनी स्वतः भेट देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या सोबत नगरसेवक सागर निबोंरकर उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी सी.सी. रोडची दुरवस्था, अपुरी नाली व्यवस्था, नळाच्या पाईपलाईन, तसेच स्वच्छतेच्या प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी पावसाळ्यात चिखल व साचलेले पाणी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांनी प्रत्येक समस्या शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नोंद घेण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांच्या मूलभूत सुविधा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. गुरुकुंज कॉलनीतील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यात येईल,” गुरुकुंज कॉलनीसह गडचिरोली शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहू देणार नाही असे स्पष्ट सांगितले.

नगरसेवक सागर निबोंरकर यांनीही परिसरातील विकासकामे गतीमान करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

या पाहणीदरम्यान बांधकाम सभापती अनिल कुनघाळकर, नगरसेवक हर्षल गेडाम, नगर सेविका कोमल नैताम, नगर परिषद कर्मचारी तसेच वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी नगराध्यक्षांनी स्वतः येऊन समस्या जाणून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांच्या यांच्या या थेट आणी सक्रिय भुमिकेमुळे गुरुकुंज कॉलनीतील विकासकामांना नवी गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रशासन आणी लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून प्रभागातील रस्ते,नाली,पाणीपुरवठा , विकासकामे , दैनदिन गरजा, व स्वच्छता व्यवस्था लवकरच सुधारेल प्रभागातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!