
गडचिरोली शहरातील विविध प्रभागात विकासकामांचा शुभारंभ; नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा धडाका
दिनांक – २६/०२/२०२६
गडचिरोली: गडचिरोली शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नगरपरिषद गडचिरोलीच्या वतीने उपाध्यक्ष निखिलजी चरडे आणि बांधकाम सभापती अनिलजी कुनघाडकर आणी प्रभागातील नगरसेवक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून या महत्त्वपूर्ण कामांना अधिकृत सुरुवात करण्यात आली.
शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रोड बांधकाम, नाली बांधकाम तसेच इतर अत्यावश्यक मूलभूत सुविधांची उभारणी हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, खराब रस्त्यांमुळे होणारी गैरसोय आणि स्वच्छतेच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. या उपक्रमांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुसूत्रता येणार असून सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे.
कार्यक्रमाला नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी तसेच संबंधित प्रभागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन प्रसंगी नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी नगराध्यक्षांच्या कार्यतत्परतेचे व नियोजनबद्ध कामकाजाचे कौतुक करत विकासाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात करून ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी विकासाचा वेग वाढवला आहे. केवळ आश्वासनांवर न थांबता कृतीतून शहराच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचा त्यांचा ठाम निर्धार या उपक्रमातून स्पष्ट झाला आहे
“माझे शहर – स्वच्छ, सुंदर आणि विकसित शहर” या संकल्पनेला मूर्त रूप देत गडचिरोली शहर आता विकासाच्या नव्या पर्वाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. आगामी काळातही अशाच विविध विकासकामांच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचा मानस नगरपरिषदेने व्यक्त केला आहे.
गडचिरोलीकरांच्या अपेक्षांना न्याय देत शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








