Home गडचिरोली लोकहितवादी पत्रकारितेचा प्रवास; जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना “न्यायदर्पण” अंक भेट

लोकहितवादी पत्रकारितेचा प्रवास; जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना “न्यायदर्पण” अंक भेट

0
11
Oplus_0

लोकहितवादी पत्रकारितेचा प्रवास; जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना “न्यायदर्पण” अंक भेट

गडचिरोली दि ०५ फरवरी :मुख्य संपादक सचिन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित होणाऱ्या न्यायदर्पण या सामाजिक, वैचारिक व लोकहितवादी अर्ध साप्ताहिक ताजा अंक गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी मा. गजानन जाधव यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आला.

या प्रसंगी न्यायदर्पणचे संपादक प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम व उपसंपादक तिलोतम्मा समर हाजरा उपस्थित होते. या भेटीदरम्यान न्यायदर्पण अर्ध साप्ताहिक आतापर्यंतच्या सामाजिक वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली.

जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न, प्रशासनातील कार्यपद्धती, ग्रामीण व आदिवासी भागातील समस्या तसेच जनहिताच्या विषयांवर न्यायदर्पण अर्ध साप्ताहिकाने केलेल्या परखड, अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ लेखनाची मा. जाधव यांनी विशेष प्रशंसा केली. पत्रकारिता ही केवळ बातम्यांचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. अशा दर्जेदार व जबाबदार पत्रकारितेमुळे नागरिकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि योग्य माहिती पोहोचते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच न्यायदर्पण अर्ध साप्ताहिक भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत लोकशाही मूल्ये, पारदर्शक प्रशासन, नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या यांसारख्या विषयांवर सातत्याने लेखन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या भेटीमुळे माध्यमे आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक संवाद अधिक दृढ होण्यास मदत होईल, तसेच समाजहितासाठी दोघांचीही भूमिका अधिक प्रभावी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!