चंद्रपूर
सणासुदीच्या दिवशी ग्रामीण भागात गोंधळी येतात.गोंधळ करतात अन त्या मोबदल्यात पैसे घेऊन जातात. आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याने राजुरा विधानसभा क्षेत्रात काही गोंधळी गोंधळ घालीत सुटले आहे. आमदाराकीच बाशिंग गुडघ्यावर बांधून निघालेल्या या अति उस्ताही नेत्यांचा ” भोंगळ ” चाळ्यांची चर्चा सुरु आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रावर काही नवे चेहरे दिसणार आहेत.राजुरा विधानसभा क्षेत्रावर अनेकांचा डोळा आहे.या विधानसभा क्षेत्रात येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीची समाजसेवा वृत्ती अचानक जागृत झाली आहे.अश्याच एका समाजसेवा नेत्याची फारच चर्चा सुरू आहे.किंवा चर्चा घडविली जात आहे.भाजपचे माजी आमदार यांना तिकीट मिळणार नाही, असे गोड स्वप्न सध्या या नेत्याला पडू लागलेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमातून या नेत्याने हातपाय पसरविण्यास सुरवात केली. ही केविलवानी धडपड ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या विधानसभा क्षेत्रावर राजकीय क्षेत्रात मोठं नाव असलेल्या नेत्यांचा प्रभाव आहे. ही नेते मंडळी मतदानाचे गणित बिघडविण्याची ताकद ठेवतात. बाहेरच्या माणूस येऊन इथं गोंधळ घालत असल्याचे बघून ही नेते मंडळी जाम संतपल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील एका मंत्राच्या भरोशावर उड्या मारणारा या नेत्याचे पुढे काय होणार? याची चर्चा संपता संपत नाही.

