Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा गडचिरोलीत भाजपकडून जाहीर निषेध!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा गडचिरोलीत भाजपकडून जाहीर निषेध!

0
11
Oplus_0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा गडचिरोलीत भाजपकडून जाहीर निषेध!

आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी; जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नोंदविला निषेध

गडचिरोली | प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने कर्तव्य कक्ष क्रमांक १ येथे जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या निषेध कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीविषयी बोलताना राजकीय नेत्यांनी भाषेचे भान आणि पदाची प्रतिष्ठा राखणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. राजकीय मतभेद असले तरी सार्वजनिक जीवनात सभ्यता, संयम आणि परस्पर सन्मान कायम राहणे गरजेचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असला तरी राजकीय टीका करताना जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजकीय चर्चेची पातळी घसरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. या निषेध कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली.

आमदार मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार नामदेव उसेंडि,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रेखाताई डोळस , किसान मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष रमेजी भुरसे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोरवते, डॉ. चंदा कोरवते, महामंत्री प्रकाश गेडाम , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, शहर अध्यक्ष अनिल कुनघाळकर, गोवर्धन चव्हाण, निखिल चरडे न.प. उपाध्यक्ष, नगरसेवक सुधाकर येनगंधलवार, अविनाश विश्वजवार,केशव निंबोड, अर्चना निंबोळ, नगरसेवक हर्षल गेडाम, साई सिल्लमवार, आकाश सातपुते, नरेश हजारे, विनोद देवोजवार,हरिष माकडे,प्रविण खडसे, निलेश नवघडे, अविनाश विश्वोजवार, रवि शुध्दलवार, विनू मडावी , आकाश बोलूवार, अंकित गव्हारे,लाकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!