
नागपूर येथे भाजपची विदर्भ विभागाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक संपन्न;गडचिरोलीतील लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
SIR संदर्भात प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांचे मार्गदर्शन
दि. 21/08/2026
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने विदर्भ विभागाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंञी डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत पार पडली. आगामी संघटनात्मक वाटचाल, पक्षाची बूथस्तरावरील बांधणी, मतदारांशी संपर्क तसेच विविध संघटनात्मक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीदरम्यान SIR संदर्भातील संघटनात्मक तयारीवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादीचे पुनरावलोकन, पात्र मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या तसेच बूथनिहाय पातळीवर कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
SIR प्रक्रियेत पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेने सक्रिय भूमिका बजावत प्रत्येक बूथवर समन्वयाने काम करावे, पात्र मतदार मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू नयेत यासाठी आवश्यक जनजागृती करावी आणि मतदार यादीच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच जिल्हा व विधानसभा स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरापर्यंत प्रभावी नियोजन करून SIR संदर्भातील कामकाजाला गती देण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार कृष्णा गजबे आणि माजी आमदार नामदेव उसेंडी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय SIR जिल्हा समितीचे संयोजक अनिल पोहनकर, सहसंयोजक अनिल तिळके, सहसंयोजक सुरज गुंडमवार, सहसंयोजक सीमा कन्नमवार तसेच BLA-1 गडचिरोलीचे हरिश माकोडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेवजी फॉए, जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सहभाग नोंदविला.
पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक स्तरावर नियोजनबद्ध कामकाज, बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार गडचिरोली जिल्ह्यात SIR प्रक्रियेसाठी नियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते बूथनिहाय नियोजन करून कामाला अधिक गती देणार असून, मतदार यादीशी संबंधित कामकाज प्रभावीपणे पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.








