Home गडचिरोली हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले मार्कंडा देवस्थान; वैनगंगेच्या तीरावर ‘महागंगा आरती’

हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले मार्कंडा देवस्थान; वैनगंगेच्या तीरावर ‘महागंगा आरती’

0
22

हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले मार्कंडा देवस्थान; वैनगंगेच्या तीरावर ‘महागंगा आरती’

मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस संकल्पनेतील धार्मिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद;भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या पूढाकराने आयोजन

विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांना अग्रपूजेचा मान; त्यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती

गडचिरोली/चामोर्शी, दि. १६ : ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मार्कंडा देवस्थान मंदिर परिसरात श्रावण सोमवारनिमित्त वैनगंगा नदीच्या तीरावर भव्य ‘महागंगा पूजा-आरती’ सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाला गडचिरोली जिल्ह्यासह नागपूर व परिसरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. ‘हर हर महादेव’ आणि ‘जय गंगा मैया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

वैनगंगा नदीचे विधिवत पूजन, धार्मिक विधी व मंत्रोच्चारानंतर आरती करण्यात आली. नदीकाठावर प्रज्वलित करण्यात आलेल्या असंख्य दीपांमुळे वातावरण अधिकच मनोहारी झाले. शंखनाद, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित भाविक भारावून गेले.

विनोद गोस्वामी महाराजांची विशेष उपस्थिती

प्रसिद्ध आध्यात्मिक वक्ते विनोद गोस्वामी महाराज यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या स्वागतासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुरलीधर महाराज, नागपुरे महाराज यांच्यासह संत-महंतांची उपस्थितीही लाभली.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मार्कंडा देवस्थान येथे ‘महागंगा पूजा-आरती’ घेण्याचा उपक्रम निश्चित करण्यात आला आहे. या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक व्यवसाय व रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.

रमेशजी बारसागडे यांच्या पुढाकारातून धार्मिक उपक्रमाला नवी दिशा

भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश मार्कंडा देवच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाला व्यापक ओळख मिळवून देणे, भाविकांसाठी आवश्यक धार्मिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना देणे हा आहे.

ऐतिहासिक मार्कंडा देव मंदिर, उत्तरवाहिनी वैनगंगा नदी आणि परिसराची समृद्ध धार्मिक परंपरा यांचा विकास व संवर्धन करण्याच्या दृष्टीने अशा धार्मिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्यास जिल्हाधिकारी मा. अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे सहाय्यक सुनीलजी मित्रा, निकटवर्तीय अनिरुद्ध पालकर,नागपूरचे आमदार मोहनजी मते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, कृष्णा गजभे, डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, संतोष भाऊ तांगडपल्लीवार, दिलीप चलाख, चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, यश गण्यारपवार यांच्यासह महाराज मंडळी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.

मार्कंडा देवस्थानचे ऐतिहासिक मंदिर, उत्तरवाहिनी वैनगंगा आणि प्राचीन धार्मिक परंपरा यामुळे या स्थळाला गडचिरोलीच्या सांस्कृतिक वैभवात विशेष स्थान आहे.

या भव्य महागंगा पूजा-आरती सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश शहा, दिलीप चलाख, भास्कर बुरे, जयरामजी चलाख, साईनाथ बुरांडे, शेषराव कोहळे, रेवनाथ कुसराम, मृत्युंजय गायकवाड, गजानन भांडेकर, नीरज रामानुजन, नरेश असावार, भाविक आभारे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मान्यवरांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!