Home गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली नगर परिषद प्रभाग क्रमांक ९...

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग

0
3
Oplus_131072

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग

 

 

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते तीन प्रचार कार्यालयांचे उद्घाटन; भाजपा उमेदवार अंकुशजी नैताम यांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन

 

गडचिरोली | प्रतिनिधी

 

गडचिरोली नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेला आज नवसंजीवनी मिळाली. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अंकुशजी नैताम यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते तीन प्रचार कार्यालयांचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

 

या उद्घाटन कार्यक्रमानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधताना भाजप नेत्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासकामांना गती देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित करत भाजपा उमेदवार श्री. अंकुशजी नैताम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये नागरिकांच्या अपेक्षांनुसार काम करणारे नेतृत्व उभे करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोहोचून जनसंपर्क वाढवावा, असे त्यांनी आवाहन केले.

 

उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मतदारांशी संवाद साधताना प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी सक्षम प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख प्रशासन उभे करण्यासाठी भाजपा उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमादरम्यान परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रचाराला अधिक जोम देण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

या प्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निंबोरकर, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, हेमंत जंबेवार तसेच नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!