Home गडचिरोली अहेरी नगर पंचायतीचे कर प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर प्राणघात हल्ला ;...

अहेरी नगर पंचायतीचे कर प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर प्राणघात हल्ला ; परिसरात खळबळ

0
3
Oplus_0

अहेरी नगर पंचायतीचे कर प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर प्राणघात हल्ला ; परिसरात खळबळ

दि. 10/06/2026

गडचिरोली:अहेरी नगर पंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (वय ३४) यांच्यावर आज सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी अधिकाऱ्यावर उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (१० जून २०२६) सकाळी सुमारे ६:४५ वाजताच्या सुमारास इंदाराम रोड परिसरात ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी त्यांना अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मारहाणीत डोक्यावर व हातावर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले असून, जखमी अवस्थेत त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिल्याचे समजते.

पोलिसांनी जखमी अधिकाऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जखमी अधिकाऱ्यांनी आपल्या तक्ररीत पूर्वी करण्यात आलेल्या प्रशासकीय कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा आरोप केला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर अधिकारी व कर्मचारी वर्गात चिंता व्यक्त होत असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!