Home गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची सदिच्छा भेट; आरोग्य सेवेत...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची सदिच्छा भेट; आरोग्य सेवेत हलगर्जी सहन केली जाणार नाही

0
8

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची सदिच्छा भेट; आरोग्य सेवेत हलगर्जी सहन केली जाणार नाही

 

विविध विभागांची पाहणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

 

गडचिरोली प्रतिनिधी |

 

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सदिच्छा भेट देत आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेच्या गुणवत्तेबाबत आढावा घेतला. या भेटीदरम्यान महाविद्यालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी करण्यात आली.

 

यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी आरोग्य सेवेशी संबंधित सर्व घटकांना स्पष्ट संदेश देत “रुग्णसेवा ही सर्वोच्च जबाबदारी असून आरोग्य व्यवस्थेमध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली. नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

भेटीदरम्यान त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांची कामकाज पद्धती, उपलब्ध सुविधा, रुग्णसेवा व्यवस्थापन तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत माहिती घेतली. आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.

 

याचवेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गरजा, सुविधा, प्रशिक्षण, वसतिगृह, अभ्यासातील अडचणी तसेच भविष्यातील अपेक्षा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनीही शिक्षणाशी संबंधित विविध मुद्दे मांडत आवश्यक सुधारणा व सुविधांची मागणी केली.

 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले की, “गडचिरोलीचा आरोग्य स्तर उंचावण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे.”

 

या भेटीदरम्यान भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री रमेशजी भुरसे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष श्री प्रशांतजी वाघरे, भाजप ज्येष्ठ नेते डॉ. भारतजी खटी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष डॉ. प्राणयजी खुणे, श्री अविनाशजी विश्रोजवार, भाजप पदाधिकारी तसेच डॉ. रजनीताई तोरे आणि डॉ. मनीषजी गेडाम उपस्थित होते.

 

या सदिच्छा भेटीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाला अधिक गती मिळण्याबरोबरच आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक संदेश गेल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!