
गडचिरोली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्य प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन
गडचिरोली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा व देशभक्तीचा जागर जनमानसात व्हावा या उद्देशाने “स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बहुउद्देशीय प्रबोधिनी , गडचिरोली” यांच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त विशेष जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वा. वि.दा. सावरकर प्रबोधिनीच्या वतीने स्वातंत्र्यवीराच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन यावर्षी गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत कर्तव्य कक्ष सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे “स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनावर” जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील प्रा. श्री. लक्ष्मीकांत प्रकाशराव कारींगवार हे उपस्थित राहून सावरकरांच्या राष्ट्रभक्ती, त्याग व क्रांतिकारक कार्यावर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला माजी खासदार श्री. अशोकजी नेते, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी वाघरे, नगराध्यक्षा प्रणोती ताई निबोंरकर, डॉ. चंदाताई कोडवते, श्री. गोविंदजी सागडा, डॉ. प्रणय खुणे यांच्यासह विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या व्याख्यानाला गडचिरोलीतील सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर बहुउद्देशीय प्रबोधिनी गडचिरोली चे अध्यक्ष रमेश भुरसे,सचिव डॉ. भारत खटी, उपाध्यक्ष प्रमोद पिपरे,सहसचिव निलकंठ भांडेकर तसेच सर्व सदस्य यांनी केला आहे.








