
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय
दिं 26/05/2026
गडचिरोली : समाजातील गरजू व वंचित घटकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या वाढदिवसानिमित्त “माणुसकीचा घास” या सामाजिक उपक्रमांतर्गत भोजनदान, गरजू रुग्णांना फळवाटप तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे उत्साहात व सामाजिक भावनेत संपन्न झाला. कार्यक्रमाद्वारे गरजूना भोजनाचे वाटप करण्यात आले तसेच रुग्णांना फळांचे वितरण करून मानवतेचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांनी केले. कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी, नगर परिषद नगराध्यक्षा, न.प. सभापती, नगरसेवक तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








