Home गडचिरोली आदिवासी योजनांसह रिक्त पदांच्या प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नाशिक...

आदिवासी योजनांसह रिक्त पदांच्या प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नाशिक येथे आदिवासी आयुक्तांशी चर्चा

0
22

आदिवासी योजनांसह रिक्त पदांच्या प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नाशिक येथे आदिवासी आयुक्तांशी चर्चा

 

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी जनसंवाद यात्रेदरम्यान भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आदिवासी आयुक्त मा. लीना बनसोडे मॅडम यांनी डॉ. होळी यांचा शाल व आदिवासी साहित्य देऊन सत्कार केला.

या भेटीदरम्यान माजी आमदार डॉ. होळी व आदिवासी आयुक्त लीना बनसोडे यांच्यामध्ये आदिवासी समाजाच्या विविध योजना, समस्या व विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये विशेषतः छोटा बिंदू नामावली संवर्गाचा प्रश्न, आदिवासी विभागातील रिक्त पदे, आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता, आदिवासी युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू करणे तसेच आदिवासी समाजातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

तसेच आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, रोजगार व उद्योगविषयक विविध प्रश्नांवरही दोन्ही मान्यवरांनी सखोल विचारमंथन केले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी माजी आमदार सुनील भुसारा, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विष्णू दाबाडे, विनायक गावित, शहराध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ चौधरी, भरत भोये तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!