Home गडचिरोली नाशिक येथे भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

नाशिक येथे भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

0
22

नाशिक येथे भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

 

आदिवासी जनसंवाद यात्रेनिमित्त भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे कार्यकर्त्यांना आदिवासी मोर्चा बळकटीकरणाचे मार्गदर्शन

 

नाशिक – भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील नाशिक भाजपा पक्ष कार्यालय येथे भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ समीकक्षीकरण, जनगणना, एस.आर.आय. तसेच आदिवासी समाजाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीला माजी खासदार भारती पवार, भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सुनील केदार नाशिक शहराध्यक्ष भाजपा, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष ( दक्षिण ) विष्णू दोबाडे, ( उत्तर ) विनायक गावित, नाशिक शहराध्यक्ष ऍड. गोरक्षनाथ चौधरी, नगरसेविका उषा बेंडकोळी, चित्रा तांदळे, सरिता सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती भामरे, गटनेता ऍड. श्याम बडोदे, जयराम भुसारे आदी मंचकावर उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान या आदिवासी मोर्चाच्या जिल्हास्तरीय बैठकीला मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आगामी काळात भाजपा संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ स्तरावर सक्रिय राहण्याचे आवाहन केले. त्यांनी जनगणना प्रक्रियेत आदिवासी समाजाची अचूक नोंद होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. तसेच एस.आर.आय. संदर्भातील विविध बाबी, आदिवासी समाजाचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मंचावर उपस्थित मान्यवारांच्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी च्या समस्या संदर्भात पक्ष स्तरावर बैठक घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. सोबतच

माजी आमदार डॉ. होळी यांनी भाजपा आदिवासी मोर्चाच्या माध्यमातून समाजामध्ये संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी आदिवासी समाजातील 25 ते 35 वयोगटातील युवक युवतीचे रोजगार भिमुक प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे, तसेच आदिवासी समाजाने आदिवासी सेवा सहकारी सोसायटी, जंगल कामगार सोसायटी, शेतकी सोसायटी आदिमध्ये सुद्धा आपला शिरकाव करून आदिवासी योजना आदिवासी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत कश्या पोहचतील या साठी प्रयत्न करावे. हे सर्व करण्यासाठी जी इच्छा शक्ती लागते त्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबविने जरुरीचे असून या पंचसूत्री मधील कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य आणि स्वजागृती या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ समीकक्षीकरण अधिक प्रभावीपणे राबविणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि संघटनात्मक कार्यक्रम गावागावात पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला.

कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आदिवासी जनसंवाद यात्रेमुळे पक्ष संघटनाला अधिक बळ मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या आदिवासी मोर्चाच्या जिल्हास्तरीय बैठकीस पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!