Home गडचिरोली तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ उपक्रमांतर्गत शपथ ग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ उपक्रमांतर्गत शपथ ग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

0
22

तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ उपक्रमांतर्गत शपथ ग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

 

सिंदखेडराजा | प्रतिनिधी

 

प्रशासनाच्या ‘माझा जिल्हा, बालविवाह मुक्त जिल्हा!’ या महत्त्वाकांक्षी आणि समाजपरिवर्तन घडविणाऱ्या उपक्रमांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील तांदुळवाडी येथे प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातून बालविवाहासारखी घातक आणि अमानुष प्रथा पूर्णतः नष्ट करण्याच्या दृढ संकल्पाने हा कार्यक्रम पार पडला.

 

दिनांक 19 एप्रिल २०२६ रोजी, रूम्हणा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभोरा बिटमधील तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात हा शपथ ग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जाणीवपूर्वक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘बालविवाह विरोधी शपथ’ देऊन उपस्थितांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ करण्यात आली.

 

या प्रसंगी तांदुळवाडीतील ग्रामस्थ, पालकवर्ग, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, अंगणवाडीतील बालकांचे पालक, तसेच आशासेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी एकत्र येत समाजातील या कुप्रथेच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी अत्यंत प्रभावी आणि मनाला भिडणारे मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर होणारे गंभीर परिणाम स्पष्ट करत हा सामाजिक कलंक दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणातून उपस्थितांमध्ये जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण झाली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, ग्रामस्थ व युवक-युवतींनी एकत्र येऊन बालविवाह न करण्याची तसेच समाजात कुठेही अशा प्रकारचा प्रयत्न होत असल्यास त्याला ठामपणे विरोध करण्याची शपथ घेतली. या सामूहिक संकल्पामुळे तांदुळवाडी परिसरात बालविवाह निर्मूलनाच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

 

हा उपक्रम केवळ शपथपुरता मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरत असून, ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ घडविण्यासाठी तांदुळवाडीने उचललेले हे पाऊल प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!