Home गडचिरोली भाजप आदिवासी मोर्चा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची निवड

भाजप आदिवासी मोर्चा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची निवड

0
19

भाजप आदिवासी मोर्चा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची निवड

 

गडचिरोली (दि. २५ एप्रिल २०२६):

भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

ही नियुक्ती भाजपा आदिवासी मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या अनुमतीने आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांनी ही निवड जाहीर केली.

याप्रसंगी गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते प्रा. सुरपाम यांना पक्षाचा दुपट्टा घालून व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, महामंत्री विनय मडावी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. नितीन कोडवते तसेच डॉ. चंदा कोडवते यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांनी आपल्या निवडीचे श्रेय राज्याचे भाजपा अनु जमाती मोर्चा चे अध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे आमदार डॉ मिलिंद नरोटे,जिल्हाध्यक्ष डॉ नितीन कोडवते माजी खासदार डॉ अशोक नेते;माजी आमदार कृष्णा गजबे डॉ.नामदेव ऊसेंन्डी महामंत्री प्रकाश गेडाम महा मंत्री विनय मडावी यांना दिले आहे. त्यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

==========imp news sir==========

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!