Home गडचिरोली इंदिरानगर–स्नेहनगर वस्तीतील “विराट हिंदू संमेलन” उत्साहात संपन्न

इंदिरानगर–स्नेहनगर वस्तीतील “विराट हिंदू संमेलन” उत्साहात संपन्न

0
31

इंदिरानगर–स्नेहनगर वस्तीतील “विराट हिंदू संमेलन” उत्साहात संपन्न

 

धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

 

गडचिरोली : दि. ०८ मार्च

 

धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, इंदिरानगर–स्नेहनगर वस्ती यांच्या वतीने आयोजित “विराट हिंदू संमेलन” मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाले. सनातन संस्कृती, सनातन धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

इंदिरानगर येथील नगरपरिषद शाळेजवळील पटांगणात आयोजित या संमेलनाला इस्कॉनचे अध्यक्ष प.पू. परमेश्वरदास महाराज यांचे आशीर्वचन लाभले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवीजी भुसारी आणि मा. लताताई समर्थ यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी हिंदू समाजाच्या एकजुटीचे महत्त्व, संस्कृतीचे जतन आणि समाजातील ऐक्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली.

 

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून योगिताताई प्रमोदजी पिपरे (भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका, माजी नगराध्यक्ष न.प. गडचिरोली), मा. प्रमोदजी पिपरे (संचालक – महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे तथा माजी सभापती नगर परिषद गडचिरोली), मा. अनिलजी कुनघाटकर (भाजपा शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती, न.प. गडचिरोली), मा. बाळासाहेब पद्मावार (माजी व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया), मा. मामीडवार ताई, बोलुवार ताई यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

 

यावेळी परिसरातील नागरिक, युवक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संमेलनाच्या माध्यमातून समाजात एकता, बंधुभाव आणि संस्कृतीबद्दल अभिमान जागृत करण्याचा संदेश देण्यात आला.

 

संतोष बोलुवार, विक्की कागदलवार   कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, इंदिरानगर–स्नेहनगर वस्ती यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या आरतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!