
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मधुकर केशवराव भांडेकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची घेतली भेट
जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे साहेब यांनी तत्काळ चौकशी समिती नेमून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले
आमगाव महाल येथील दिनांक १३/२/२०२६ वेळ २:३० वाजता नायरा तानाजी कुकडकर ही अंगणात खेळत असताना सापांनी दंश केला सदर घटना ती आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव म उपचाराकरिता नेले असता तेथील कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर हेंद्रे यांनी कुठली शहानिशा न करता व उपचार न करता तिला रेफर म्हणून चामोर्शिला पाठविले
चामोर्शीला उपचाराकरिता नेत असताना वाटेतच तिची प्रकृती गंभीर झाली त्यानंतर चामोशी रुग्णालया मृत्यू घोषित केले.
संबंधित प्रकरणात प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर हेंद्रे त्यांच्या निष्काळजीपणामुळे तेथील चिमुकलीचा जीव गमवावा लागला
या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता सबंधित डॉक्टरवर कर्तव्यात कसूर केल्याने मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई झाली पाहिजे या मागणी करिता जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे साहेब यांची भेट घेऊन तत्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात मागणी केली
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लगेच फोन द्वारे तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी यांना सूचना करून चौकशी होत पर्यंत सबंधित डॉक्टर यांना तिथून तत्काळ हटविण्यात यावे व नवीन डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी असे निर्देश दिले आणि चौकशी अहवाल तत्काळ सादर करण्यासंदर्भात सूचना केली.








