Home गडचिरोली गडचिरोलीत भाजपाचा आक्रमक निषेध आंदोलन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरील वक्तव्याविरोधात इंदिरा गांधी...

गडचिरोलीत भाजपाचा आक्रमक निषेध आंदोलन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरील वक्तव्याविरोधात इंदिरा गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी

0
52

गडचिरोलीत भाजपाचा आक्रमक निषेध आंदोलन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरील वक्तव्याविरोधात इंदिरा गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी शहर व जिल्हा यांच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत करण्यात आल्याच्या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, गडचिरोलीतही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याची व इतिहासाची तुलना करणे हे जनतेच्या भावना दुखावणारे आहे,” असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.

आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी बोलताना राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे.”

या आंदोलनात माजी खासदार अशोक नेते, नगराध्यक्ष अँड प्रणोती सागर निबोंरकर, उपनगराध्यक्ष निखील चरडे, जिल्हा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, शहराध्यक्ष तथा न.प. बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, सभापती मुक्तेश्वर काटवे, सभापती हर्षल गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, नगरसेवक सागर निबोंरकर, नगरसेवक शेखर आखाडे, नगरसेविका वर्षा शेडमाके, नगरसेविका साक्षी बोलूवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलन शांततेत पार पडले असले तरी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!