Home गडचिरोली कॉम्प्लेक्स प्रभागातील नाल्याच्या प्रश्नावर ठोस पावले;नगरपरिषद सभापती लीलाधर भरडकर यांचा पाठपुरावा; नागरिकांमध्ये...

कॉम्प्लेक्स प्रभागातील नाल्याच्या प्रश्नावर ठोस पावले;नगरपरिषद सभापती लीलाधर भरडकर यांचा पाठपुरावा; नागरिकांमध्ये समाधानाची भावना

0
32

कॉम्प्लेक्स प्रभागातील नाल्याच्या प्रश्नावर ठोस पावले;नगरपरिषद सभापती लीलाधर भरडकर यांचा पाठपुरावा; नागरिकांमध्ये समाधानाची भावना

गडचिरोली : शहरातील प्रभाग क्रमांक ११ सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरातील पंचवटी नगर, गणेश नगर, बजरंग नगर आणि रेवणी कॉलनी येथून जाणाऱ्या मुख्य नाल्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनली आहे. पावसाळ्यात नाल्यातील पाणी तुंबणे, सांडपाण्याची दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी गल्लोगल्ली जाऊन नाल्यांची स्थिती पाहिली व साचलेला गाळ, कचरा तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक स्वच्छता व दुरुस्ती कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदूरकर यांना परिस्थितीची सविस्तर माहिती देत स्थायी व शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मोठ्या नाल्यात साचलेला गाळ व कचरा पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे काढण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले.

याशिवाय परिसरातील आरोग्यविषयक समस्या, नालीसफाईतील त्रुटी, अस्वच्छता, पथदिव्यांची अडचण तसेच पाणीपुरवठ्याच्या समस्या यांकडेही लक्ष वेधण्यात आले. “नागरिकांच्या दारी जाऊन समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना दिलासा देऊ,” असे आश्वासन सभापती भरडकर यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात सामाजिक कार्यकर्ते रोशनभाऊ कवाडकर, हिमांशू खरवडे, बादल कंकलवार, काव्य वालदे, अमोलभाऊ जेटीवार, मंथन बुलबुले तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनीही नगरपरिषदेकडून तातडीने ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली असून, या उपक्रमामुळे प्रभागातील नाल्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!