Home गडचिरोली गडचिरोली ला तातडीची मदत द्या! नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर 

गडचिरोली ला तातडीची मदत द्या! नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर 

0
31

गडचिरोली ला तातडीची मदत द्या! नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर

गडचिरोली नगर परिषदेसाठी दोन रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून द्या आरोग्यमंञी प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

 

गडचिरोली : शहर व जिल्ह्यातील वाढत्या आरोग्य गरजांचा विचार करता गडचिरोली नगर परिषदेसाठी दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम व तातडीची मागणी नगराध्यक्ष अँड प्रणोती सागर निबोंरकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.

मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित आरोग्य सेवेबाबतच्या आढावा बैठकीदरम्यान नगराध्यक्षांनी आरोग्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर झालेल्या बैठकित त्यांनी रूग्णवाहिकांबाबची मागणी जोरदारपणे मांडली. सध्या उपलब्ध रुग्णवाहिका अपुऱ्या पडत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगराध्यक्षांनी जिल्ह्यातील एकूण आरोग्य व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करत जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता, अत्यावश्यक औषधसाठ्याची उपलब्धता तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती याकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागामुळे गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि तत्पर असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेषतः अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण व गर्भवती महिलांना वेळेवर उपचारासाठी शहरात किंवा उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज रुग्णवाहिका अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषदेला दोन नव्या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास आपत्कालीन सेवा अधिक वेगवान व परिणामकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त केली. मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गडचिरोलीतील आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, लवकरच ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या बैठकीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!