Home गडचिरोली बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांच्या पुढाकाराने लांझेडा वार्डातील रस्त्याच्या समस्येला मिळणार दिलासा;...

बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांच्या पुढाकाराने लांझेडा वार्डातील रस्त्याच्या समस्येला मिळणार दिलासा; खडीकरण व सी.सी. रोडसाठी ठोस हालचाली

0
24

बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांच्या पुढाकाराने लांझेडा वार्डातील रस्त्याच्या समस्येला मिळणार दिलासा; खडीकरण व सी.सी. रोडसाठी ठोस हालचाली!

वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नाला गती; प्रभाग क्र.2 मधिल विकासासाठी लोकप्रतिनिधींनीची एकजूट

गडचिरोली : प्रभाग क्र.2 लांझेडा वार्डातून खंरपूडी रोड बायपासकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील गंभीर समस्येकडे बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांनी स्वतः लक्ष घालत तातडीने पाहणी केली. रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटर लाईनमुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असून पावसाळ्यात चिखल व खोल गड्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे.

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अनिल कुनघाडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या मार्गावरून शेतकऱ्यांची शेतीकडे ये-जा होत असल्याने शेतमाल वाहतूक व दैनंदिन हालचालींना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक हर्षल गेडाम यांनीही नागरिकांच्या अडचणींवर ठोस भूमिका घेत, “लांझेडा वार्डातील नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही आपली जबाबदारी आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी केली.

नगर सेविका कोमल नैताम यांनी स्थानिक पातळीवरील समस्यांचा तपशील मांडत, रस्त्याचे खडीकरण आणि पुढील टप्प्यात दर्जेदार सी.सी. रोड उभारणीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

लांझेडा ते गुरुदेव नैताम यांच्या शेतापर्यंत रस्त्याचे तात्काळ खडीकरण करून कायमस्वरूपी उपाय म्हणून सी.सी. रोड उभारण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी एकमुखी भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्याची माहिती मिळाली.

यावेळी मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदुरकर, भाजयुमो शहर महामंत्री निखिल गुंडमवार, शञपती नैताम , नगर परिषद कर्मचारी तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींचा अभ्यास करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांच्या पुढाकारासोबतच नगरसेवक हर्षल गेडाम व नगर सेविका कोमल नैताम यांच्या सक्रिय भूमिकेमुळे लांझेडा वार्डातील दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींच्या एकजुटीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!