Home गडचिरोली उद्योग जनता कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन; नवउद्योजकांना मोठे बनण्याचे माजी आमदार डॉ. देवराव...

उद्योग जनता कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन; नवउद्योजकांना मोठे बनण्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

0
14

उद्योग जनता कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन; नवउद्योजकांना मोठे बनण्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

गडचिरोली : मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारातून दर गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उद्योग जनता कार्यशाळे’त माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला.
यावेळी डॉ. होळी यांनी रोजगार निर्मितीचे तंत्र आत्मसात करणे का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नोकरीच्या शोधात न राहता युवकांनी उद्योजकतेकडे वळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास, उद्योग व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास या बाबींचे ज्ञान घेतल्यास युवक स्वतः रोजगारनिर्माते बनू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नवउद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि स्वतःचा उद्योग उभारून मोठे उद्योजक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा प्रभावी वापर केल्यास जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वावलंबनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे osd सुनील मित्रा, dic महाव्यवस्थापक घ्यानोबा चोरघडे, महिला महामंत्री वंदना शर्मा, घुमन श्रीवास्तव, नितीन महाजन आदी प्रामुख्याने उपस्थित राहून नवं उद्योजकांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!