Home गडचिरोली ग्रामीण क्रीडेला नवे बळ: गुरवळा (टोली) येथे भव्य डे–नाईट कबड्डी स्पर्धेचे हेमंत...

ग्रामीण क्रीडेला नवे बळ: गुरवळा (टोली) येथे भव्य डे–नाईट कबड्डी स्पर्धेचे हेमंत बोरकुटे यांच्या हस्ते उद्घाटन

0
28

ग्रामीण क्रीडेला नवे बळ: गुरवळा (टोली) येथे भव्य डे–नाईट कबड्डी स्पर्धेचे हेमंत बोरकुटे यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडा गुणांना चालना देणारी नवयुवक क्रीडा मंडळ गुरवळा (टोली) आयोजित भव्य डे–नाईट कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू झाली. या स्पर्धेत विजेत्या संघासाठी ₹51,000/- प्रथम बक्षीस, ₹34,000/- द्वितीय बक्षीस व ₹14,000/- तृतीय बक्षीस जाहीर करण्यात आले असून, इतर आकर्षक पारितोषिकेही प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे भव्य उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती, गडचिरोलीचे संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. हेमंत बोरकुटे यांच्या हस्ते झाले. क्रीडा व युवक सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून हेमंत बोरकुटे यांनी ग्रामीण क्रीडेला प्रोत्साहन देण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हेमंत बोरकुटे यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्रीडा गुणवत्ता असून योग्य व्यासपीठ व पाठबळ मिळाल्यास हेच युवक जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर नाव उज्वल करू शकतात, असा ठाम विश्वास व्यक्त केला. गुरवळा (टोली)सारख्या ग्रामीण भागात डे–नाईट कबड्डी स्पर्धांचे आयोजन होणे ही सकारात्मक सामाजिक बदलाची सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक पातळीवरही क्रीडा, शिक्षण व युवक विकासासाठी सातत्याने योगदान देण्याची आपली भूमिका कायम राहील, असे आश्वासन देत त्यांनी नवयुवक क्रीडा मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ग्रामीण युवकांना संधी, दिशा व बळ देणारे नेतृत्व म्हणून हेमंत बोरकुटे यांची भूमिका प्रेरणादायी ठरत आहे, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांतून व्यक्त झाली.

या सोहळ्यास उद्घाटक आमदार डॉ. मिलिंद नरोटे, सहउद्घाटक माजी आमदार देवराव होळी (प्रदेश उपाध्यक्ष), उपाध्यक्ष सचिन येनप्रेड्डिवार, मा. दत्तू सुतारपवार (तालुका अध्यक्ष, भाजपा), दीपप्रज्वलन सौ. जयाताई मंटकवार (सरपंच, ग्रा. पं. गुरवळा), सौ. निशाताई आयतूलवार (माजी सरपंच व सदस्य, ग्रा. पं. गुरवळा), चंद्रकांत भोयर (सदस्य, ग्रा. पं. गुरवळा), राहुल पोरड्डिवार यांच्यासह अनेक विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवशाही स्टेडियम, गुरवळा (टोली) येथे आयोजित या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडासंस्कृतीला नवे बळ मिळाले आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन, शिस्तबद्ध आयोजन आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभत आहे.

आयोजनाबद्दल नवयुवक क्रीडा मंडळ गुरवळा (टोली) यांचे सर्वत्र कौतुक होत असून, हेमंत बोरकुटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण व मार्गदर्शक नेतृत्वामुळे ग्रामीण भागात अशा प्रेरणादायी उपक्रमांना नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!