
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची जनसंवाद यात्रे दरम्यान गडचिरोली नगरपरिषदेला सदिच्छा भेट
गडचिरोली | माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथे जनसंवाद यात्रे दरम्यान नगरपरिषदेला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात यावेळी सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नगरपरिषद प्रशासकीय भवनाला वाढीव निधी देण्यात यावा, वाढीव गटार लाईन साठी निधी उपलब्ध करून देणे, वाढीव पाणी पुरवठा योजनेचा 132 कोटींचा वर्क आडर काढणे, गडचिरोली शहराचा C. T. सर्वे करणे, गडचिरोली शहरातील सर्व तलाव नगरपरिषदला हस्तान्तरीत करणे, अतिक्रमण पट्टे नियमित करणे, अंडर ग्राउंड इलेक्ट्रिक सिटीला मंजुरी मिळविणे, गोकुळ नगर मध्ये प्ले ग्राउंड ला मंजुरी देणे, शहरातील ओपन स्पेस डेव्हलोपमेंट करणे, प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करणे, गडचिरोली शहराच्या बाजूने रिंग रोड तयार करणे, शहरातील तलावांचे सौंदर्यकरण करणे, गुजरी व आठवडी बाजाराचे सौंदर्यकरणकरणे, शहरातील मोठया नाल्यावर क्लोज्ड ड्राइनाज करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, ढोरफोडी येथील 11 एकर जमीनीचे डेव्हलोपमेंट करणे आदी विषयांसोबतच गडचिरोली शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, जलनिस्सारण व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. शहराच्या भविष्यातील विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करण्याबाबत डॉ. देवराव होळी यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हा सर्व डेटा गोळा करून संबंधित मंत्री, विभाग व मुख्यमंत्री यांसोबत बसून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.
विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नगराध्यक्ष व नगरसेवकांनीही शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर आपली मते मांडली. या बैठकीला नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोळकर, उपाध्यक्ष निखिल चरडे, सभापती मुक्तेश्वर काटवे, हर्षल गेडाम, सीमा कन्नमावर, नगरसेवक सतीश विधाते, रवी मेश्राम, बाळू टेभुर्णे, सागर निंबोळकर, पराग पोरेड्डीवार, रमेश चौधरी, शिल्पा गव्हारे, साक्षी बोलीवर, मनीषा खेवले, मेघा वरगंटीवार, अर्चना निंबोड, ज्ञानेश्वरी धंदरे, गुड्डी मारबते आदी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान शहराच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा होऊन मार्गदर्शन मिळाल्याने नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.








