Home गडचिरोली माजी नगरसेवक तथा भा.लो.समन्वय प्रमोदजी पिपरे यांचे वडिल, जेष्ठ शिक्षकतज्ञ शंकरराव पिपरे...

माजी नगरसेवक तथा भा.लो.समन्वय प्रमोदजी पिपरे यांचे वडिल, जेष्ठ शिक्षकतज्ञ शंकरराव पिपरे काळाच्या पडद्याआड

0
38
  • माजी नगरसेवक तथा भा.लो.समन्वय प्रमोदजी पिपरे यांचे वडिल, जेष्ठ शिक्षकतज्ञ शंकरराव पिपरे काळाच्या पडद्याआड

 

गडचिरोली येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, वसंत विद्यालयाचे सेवा-निवृत्त शिक्षक श्री. शंकरराव बालाजी पिपरे यांचे दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

स्व. शंकरराव पिपरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शेकडो विद्यार्थ्यांना घडवून शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. साधेपणा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयीची आपुलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक आदर्श व्यक्ती म्हणून ते सर्वांच्या स्मरणात राहतील.

 

त्यांच्या पश्चात पुत्र माजी नगरसेवक श्री. प्रमोद पिपरे, श्री. अनिल पिपरे, नातू श्री. अनुराग पिपरे, श्री. ऋषिकेश पिपरे,लोकेश पिपरे सून नगरसेवक योगिता पिपरे (माजी नगराध्यक्ष तथा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष) तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.

 

त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता च्या दरम्यान गडचिरोली येथील रेडी गोडाऊनजवळील निवासस्थानापासून निघणार असून वैनगंगा नदीच्या स्मशान घाटावर (बोरमाडा घाट) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी व नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

 

— शोकाकुल पिपरे परिवार, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!