Home गडचिरोली अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स;१८ मेपासून गडचिरोलीत प्रशिक्षण; इच्छुकांनी...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स;१८ मेपासून गडचिरोलीत प्रशिक्षण; इच्छुकांनी QR कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

0
27

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स;१८ मेपासून गडचिरोलीत प्रशिक्षण; इच्छुकांनी QR कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

 

गडचिरोली, (जिमाका) दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १८ मे २०२६ पासून गडचिरोली येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे सुरू होणार आहे.

 

या योजनेअंतर्गत महा-टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक युवक-युवतींना अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण तसेच परीक्षाभिमुख तयारीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आदिवासी युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक वातावरण, मार्गदर्शन आणि निवासी सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील, जून २०२६ मध्ये होणाऱ्या महा-टीईटी परीक्षेसाठी अर्ज किंवा नोंदणी केलेले इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, सामाजिक व जातविषयक माहिती, शैक्षणिक पात्रता, नोकरीचा तपशील असल्यास तो, महा-टीईटी परीक्षेसंबंधित माहिती तसेच क्रॅश कोर्स प्रशिक्षणाबाबत आवश्यक माहिती नोंदविणे गरजेचे आहे.

 

अर्जासाठी उमेदवारांनी आधार कार्डची प्रत आणि जून २०२६ महा-टीईटी अर्ज किंवा नोंदणी पावतीची प्रत जोडणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी यासोबतचा क्यु-आर कोड स्कॅन करून नोंदणी करावी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी atc.ngp-mh@mah.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

 

गडचिरोली जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!