Home गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते मार्कंडादेव येथे भाजपा पंडित दीनदयाळ उपाध्याय निवासी...

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते मार्कंडादेव येथे भाजपा पंडित दीनदयाळ उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियानाचे उद्घाटन

0
18

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते मार्कंडादेव येथे भाजपा पंडित दीनदयाळ उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियानाचे उद्घाटन

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व गडचिरोली शहर मंडलात एकाच दिवशी प्रशिक्षण; जिल्ह्यातील 15 मंडलांमध्ये होणार प्रशिक्षण महाअभियान

‘राष्ट्र प्रथम’ भावनेतून विकसित भारत 2047 संकल्पासाठी कार्यकर्ते सज्ज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी मंडल व गडचिरोली शहर मंडल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग 14 मार्च ते 15 मार्च 2026 दरम्यान चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थान परिसरातील रामप्रसाद महाराज मठ तसेच गडचिरोली शहरातील आय फॉर्म, आरमोरी रोड येथे उत्साहात पार पडला.

चामोर्शी येथील प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षण वर्गामध्ये चामोर्शी मंडल व गडचिरोली शहर मंडलातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संघटन बळकटीसाठी व राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये “राष्ट्र प्रथम” ही भावना उराशी बाळगून “विकसित भारत 2047” या संकल्पपूर्तीसाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा उत्साह, संघटनाबद्दलची बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मधुकर भाऊ भांडेकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, अनिलभाऊ पोहणकर, माजी मंडल अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर, चामोर्शी मंडल अध्यक्ष श्रीमती रोशनीताई वरघंटे यांनी केले.
यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व वरिष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मंडल व बूथ स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षण वर्गामध्ये संघटनात्मक कार्यपद्धती, बूथ सशक्तीकरण, सोशल मीडिया प्रभावी वापर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक रणनीती या विषयांवर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व 15 मंडल स्तरावर देखील अशाच प्रकारचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होऊन कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या निवासी प्रशिक्षण शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून “राष्ट्र प्रथम – विकसित भारत 2047” या ध्येयासाठी भाजपा कार्यकर्ते अधिक सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!