Home गडचिरोली प्रभाग क्रमांक ३ मध्ये वन हक्क समितीची निवड; अशोक ऋषी नैताम बहुमताने...

प्रभाग क्रमांक ३ मध्ये वन हक्क समितीची निवड; अशोक ऋषी नैताम बहुमताने अध्यक्ष

0
24

प्रभाग क्रमांक ३ मध्ये वन हक्क समितीची निवड; अशोक ऋषी नैताम बहुमताने अध्यक्ष

 

गडचिरोली, दि. २६ फेब्रुवारी २०२५

 

गडचिरोली येथील नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये वन हक्क समितीची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करत अशोक ऋषी नैताम यांची वन हक्क समितीच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.

 

निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अशोक नैताम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निबोरकर यांनी त्यांचे अभिनंदन करून समितीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न तसेच वन हक्काशी संबंधित विषय प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

या बैठकीदरम्यान वन हक्क समितीच्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली. नियुक्त सदस्यांमध्ये तुषार मडावी, सुरज मडावी, सुष्मा गेडाम, वनिता सुरपाम, प्रदीप वैरागडे, भारत पाकमोडे, रत्नमाला शेट्टे, नितीन बुरांडे, प्रकाश महेशकर, भाष्पकर बांबोडे, हेमंत सोनटक्के, प्रमोद पिपरे, लिलाधर भांडेकर आणि दुर्गा कुनघाडकर यांचा समावेश आहे. समितीच्या माध्यमातून प्रभागातील वन हक्काशी संबंधित प्रश्न सोडविणे तसेच नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करणे या दृष्टीने समिती कार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

या निवड प्रक्रियेदरम्यान नगर परिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, नगरसेविका योगिता पिपरे तसेच इतर सभापती व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वन हक्क समितीची स्थापना झाल्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून वन हक्क, जमीन हक्क तसेच स्थानिक विकासाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!