Home गडचिरोली सर्च येथे लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन – तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते 7...

सर्च येथे लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन – तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते 7 व 8 फेब्रुवारीला

0
44
Oplus_131072

सर्च येथे लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन – तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते 7 व 8 फेब्रुवारीला

 

गडचिरोली जिल्ह्यातील लहान मुलांसाठी आरोग्यसेवेत मोठा उपक्रम! सर्च चातगाव, ता. धानोरा, जि. गडचिरोली येथे मॉ दंतेश्वरी दवाखान्यात 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय तपासण्या आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते हर्निया, हायड्रोसिल, अविकसित अंडकोष, शरीरावरील गाठी, मूत्रमार्ग लिंगाच्या खाली उघडणे आणि लघवी थेंब थेंब येणे यांसारख्या समस्या असलेल्या 15 वर्षाखालील मुलांवर शस्त्रक्रिया मोफत केली जाईल. यासोबतच औषधे व संपूर्ण वैद्यकीय तपासण्या देखील मोफत करण्यात येतील.

 

रुग्ण मुलांना दवाखान्यात तपासणी करून शस्त्रक्रियेची तारिख दिली जाईल. तसेच रुग्ण मुलांचा एक नातेवाईक आणि भरती रूग्ण यांच्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

संपर्क व अधिक माहितीसाठी: 9420740191

 

नगरातील पालकांसाठी सुवर्णसंधी: आपल्या मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी हा उपक्रम एक अद्वितीय संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!