
घोट येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने आर्थिक मदत!…
दिनांक 30 जानेवारी 2026 गडचिरोली येथील सिटी हॉस्पिटल येथे घोट येथील रहिवाशी वाहनचालक विजय पुल्लीवार वय( 40 )गेल्या चार वर्षापासून मुख रोग कॅन्सरने ग्रस्त आहे याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये यांनी माहिती दिली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी तात्काळ दखल घेतली व आज सदिच्छा भेट दिली व या रुग्णास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने आर्थिक मदत केली व येथील मुख्य डॉ.यशवंत दुर्गे साहेब यांची सुद्धा भेट घेतली व पुढील उपचाराबाबत माहिती जाणून घेऊन, आवश्यकता भासल्यास आपण पुढील उपचार सुद्धा करू असे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, प्रवीण भाऊ गेडाम व
राष्ट्रीय मानवाधिकार संघटन कार्यकर्ते विलास भाऊ वडेट्टीवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








