Home गडचिरोली राज्य सरकारने कोठरी बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी मंजूर करावा.!डॉ. प्रणय...

राज्य सरकारने कोठरी बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी मंजूर करावा.!डॉ. प्रणय भाऊ खुणे

0
14
Oplus_131072

राज्य सरकारने कोठरी बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी मंजूर करावा.!डॉ. प्रणय खुणे

दिनांक 16 ऑगस्ट 2026 घोट रेगळी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील एकमेव व अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेला कोठरी बुद्ध विहार आजही विकासापासून कोसो दूर आहे या ठिकाणी दरवर्षी वर्षावास समारोह संपन्न होतो. या वर्षावास समारोहासाठी संपूर्ण देशभरातून विविध राज्यातील भंते मान्यवर येतात तसेच बौद्ध समाजातील हजारो नागरिक या सहकुटुंब येत असतात परंतु येथील सोयी सुविधेच्या अभावामुळे बौद्ध समाज बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सदर बौद्ध विहार हा राज्य शासनाच्या ( क) वर्ग दर्जा प्राप्त आहे. परंतु अतिशय कमी निधी उपलब्ध होत,असल्याने या ठिकाणी अनेक विकास कामे आजही प्रलंबित आहेत.येथील स्थानिक व जिल्ह्यातील बौद्ध समाज बांधव व इतर समाज बांधव तथा येथील भंते भगीरथजी यांच्या अथक प्रयत्नामुळे येथील अनेक कार्य लोकसभागातून पूर्ण झालेले आहेत.व इतर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या भरीव निधीची आवश्यकता आहे तरी राज्य शासनाने कोठरी बौद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी मंजूर करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे
यांनी केली. यावेळी भाजपा घोट आष्टी मंडळ भाजपा अध्यक्ष राकेश सरकार, महामंत्री विनोद किरमे, विकास मैत्र, पलाश घरामी, महेश विश्वास व राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!