Home गडचिरोली मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर खोब्रामेंढा येथे भव्य मोफत दमा व इतर आजारावर औषधी...

मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर खोब्रामेंढा येथे भव्य मोफत दमा व इतर आजारावर औषधी वाटप शिबिर

0
18

मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर खोब्रामेंढा येथे भव्य मोफत दमा व इतर आजारावर औषधी वाटप शिबिर

 

दमा, मिरगी, मुतखडा, कॅन्सरसह विविध आजारांवरील पारंपरिक औषधींचे विनामूल्य वितरण

 

कुरखेडा (प्रतिनिधी): गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र हनुमान देवस्थान, खोब्रामेंढा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मृग नक्षत्राच्या पवित्र मुहूर्तावर भव्य मोफत औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमानाच्या कृपेने आणि जनकल्याणाच्या भावनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ हजारो भाविक आणि रुग्ण दरवर्षी घेत असतात.

 

यावर्षी सोमवार दि. ८ जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता औषधी वाटपाला प्रारंभ होणार असून मंगळवार दि. ९ जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. या कालावधीत येणाऱ्या सर्वांना कोणतेही शुल्क न आकारता औषधींचे वितरण करण्यात येणार आहे.

 

या औषधींचा लाभ विशेषतः दमा, मिरगी, मुतखडा, कॅन्सर आदी विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना मिळणार असून, निरोगी व्यक्तीदेखील भविष्यातील आरोग्य संवर्धनासाठी या औषधींचा लाभ घेऊ शकतात. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना या शिबिराचा वर्षानुवर्षे फायदा झाल्याचे अनुभव सांगितले जातात.

 

याशिवाय, कोणत्याही प्रकारचा सर्पदंश झाल्यास संबंधित व्यक्तीचे नाव व माहिती तात्काळ खालील मोबाईल क्रमांकांवर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

संपर्क क्रमांक :

📞 7588364987

📞 9405815467

 

या उपक्रमाचे मार्गदर्शक व परिचयकार भक्तदास नरुले महाराज असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनसेवेचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या दुर्मिळ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

स्थळ

 

श्री क्षेत्र हनुमान देवस्थान, खोब्रामेंढा,

ता. कुरखेडा, जि. गडचिरोली

 

वेळ

 

सोमवार दि. ८ जून २०२६ दुपारी १.३० वाजता ते

मंगळवार दि. ९ जून २०२६ दुपारी १.३० वाजेपर्यंत

 

विशेष सूचना : खोब्रामेंढा हे गाव मालेवाडा येथून पूर्वेस सुमारे १० कि.मी. अंतरावर असून भाविक व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या जनकल्याणकारी उपक्रमाचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!