Home गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली“पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत गडचिरोली...

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली“पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत गडचिरोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

0
19
Oplus_131072

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली“पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत गडचिरोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

 

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत गडचिरोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दि. 21 व 22 मे रोजी आ. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण वर्गाला जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

प्रशिक्षण वर्गाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या विचारांना उजाळा दिला. पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक बळ निर्माण करणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी अधिक सक्षम करणे हा या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य उद्देश होता.

 

प्रशिक्षण वर्गात विविध विषयांवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.

“सैद्धांतिक विचार, एकात्म मानवतावाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद व पंचनिष्ठा” या विषयावर रमेशजी भूरसे यांनी मार्गदर्शन केले.

“संघटनात्मक विस्तार आणि बळकटीकरण” या विषयावर नागपूरचे माजी आमदार गिरीशजी व्यास यांनी मार्गदर्शन केले.

“कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारीची जाणीव” या विषयावर भाजपा प्रदेश सचिव तथा मा. आमदार डॉ. परिणय फुके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

तसेच “आपली कार्यपद्धती” या विषयावर विदर्भ विभाग संघटन प्रमुख व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र मा. डॉ. उपेंद्रजी कोटेकर यांनी मार्गदर्शन केले.

“बूथ व्यवस्थापन, स्थायी कार्यक्रम, मन की बात व एस.आय.आर.” या विषयावर नागपूर महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय प्रमुख मा. संजय फांजे यांनी मार्गदर्शन केले.

योगासन सत्र माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी घेतले.

 

“आपला इतिहास आणि विकास” या विषयावर नागपूरचे माजी आमदार मा. अनिल सोले यांनी मार्गदर्शन केले.

“देशासमोरील आव्हाने आणि निदानासाठी आपले प्रयत्न” या विषयावर माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री आदिवासी मोर्चा मा. डॉ. अशोक नेते यांनी मार्गदर्शन केले.

“आपल्या सरकारची गरीब कल्याण योजना आणि संघटन भूमिका” या विषयावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदासजी तडस यांनी मार्गदर्शन केले.

 

व्यवहारीक सत्र माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी घेतले.

तसेच “सोशल मीडिया व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान आणि प्रभावी सूचना तंत्र” या विषयावर महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया समन्वयक सागर फुंडकर यांनी मार्गदर्शन केले.

“विचार परिवार” या विषयावर नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवाणीताई दाणी यांनी मार्गदर्शन केले.

 

प्रशिक्षण वर्गाचा समारोप गडचिरोली जिल्हा प्रभारी कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

 

या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!