Home गडचिरोली गडचिरोलीत ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा; महिला शक्तीचा अभूतपूर्व उत्साह;...

गडचिरोलीत ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा; महिला शक्तीचा अभूतपूर्व उत्साह; नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांची उपस्थिती

0
33
Oplus_131072

गडचिरोलीत ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा; महिला शक्तीचा अभूतपूर्व उत्साह; नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांची उपस्थिती

गडचिरोली | प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ाच्या समर्थनार्थ गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रा रॅलीला महिला शक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीने संपूर्ण शहरात नारी सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिला.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देत त्यांच्या सन्मानाला नवी उंची दिली असून, हा निर्णय नव्या भारताच्या सशक्त आणि समताधिष्ठित निर्मितीचा पाया असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

इंदिरा गांधी चौक येथून रॅलीची उत्साहात सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत ‘नारी शक्तीचा सन्मान, हाच भारताचा अभिमान’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही पदयात्रा ‘कर्तव्य कक्ष’ (जनसंपर्क कार्यालय) येथे उत्साहात संपन्न झाली.

या रॅलीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. विविध वयोगटातील महिला, युवती आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक व बॅनर घेत नारी सक्षमीकरणाचा संदेश घरोघरी पोहोचवला. संपूर्ण गडचिरोली शहर ‘नारी शक्ती’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर, देसाईगंज नगराध्यक्ष लताताई सुंदरकर, माजी जि.प. अध्यक्ष योगिताताई भांडेकर, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा योगिताताई पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तुजी सूत्रपवार तसेच गडचिरोली, आरमोरी, वडसा येथील नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीदरम्यान नगराध्यक्षा प्रणोतीताई यांनी महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हे विधेयक ऐतिहासिक असल्याचे सांगत महिलांनी समाज आणि राष्ट्रनिर्मितीत अधिक प्रभावी भूमिका बजावण्याचे आवाहन केले. सहभागी झालेल्या सर्व महिला व कार्यकर्त्यांचे आभार मानत आगामी काळातही अशाच एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या भव्य पदयात्रेद्वारे ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ाला ठोस पाठिंबा देत महिला सक्षमीकरणाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!