Home गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते भामरागडमध्ये ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’चा उत्साहात...

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते भामरागडमध्ये ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’चा उत्साहात शुभारंभ

0
16

जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते भामरागडमध्ये ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’चा उत्साहात शुभारंभ

 

गडचिरोली:भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत भामरागड मंडळाच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

पक्ष संघटन अधिक बळकट करणे आणि कार्यकर्त्यांना विचारधारेची सशक्त शिदोरी देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी मान्यवरांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी वातावरणात राष्ट्रभावना आणि संघटनात्मक उत्साह पाहायला मिळाला.

 

या प्रसंगी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा व तालुकास्तरीय नेते तसेच भामरागड मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या निवासी प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना पक्षाचा इतिहास, विचारधारा, केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावरील नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

‘कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा’ — रमेशजी बारसागडे

 

उद्घाटनपर भाषणात जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी सांगितले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’ हा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आणि प्रशिक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. भामरागडसारख्या दुर्गम भागात पक्षाची मुळे अधिक घट्ट करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

या प्रशिक्षणात भामरागड तालुक्यातील शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भामरागड मंडळ अध्यक्ष व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

 

प्रशिक्षण उद्घाटन सत्रात जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा मंत्री दिलीप चलाक, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, नगराध्यक्ष सौ. रामबाई महाका (न.प. भामरागड), तालुका अध्यक्ष अर्जुन अलाम, तसेच तालुका महामंत्री तपेश हलधर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!