Home गडचिरोली शहीद वीर बाबुराव शेडमेक यांची जयंती १२ मार्चला राज्यभर साजरी करा.- माजी...

शहीद वीर बाबुराव शेडमेक यांची जयंती १२ मार्चला राज्यभर साजरी करा.- माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे आव्हान

0
18

शहीद वीर बाबुराव शेडमेक यांची जयंती १२ मार्चला राज्यभर साजरी करा.- माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे आव्हान

गडचिरोली – १२ मार्च रोजी शहीद वीर क्रांतिकारी बाबुराव शेडमेक यांची जयंती राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकार द्वारे जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जाहीर केला.
या निर्णयानुसार १२ मार्च रोजी राज्यातील सर्व प्रकल्प कार्यालये, आश्रम शाळा, आदिवासी वसतिगृहे तसेच जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहीद वीर बाबुराव शेडमेक यांच्या कार्याचा व बलिदानाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हा कार्यक्रम आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच १२ मार्च रोजी राज्यातील सर्व भाजपा जिल्हा कार्यालये, तालुका व मंडळ स्तरावर तसेच विविध आदिवासी संघटनांच्या वतीने शहीद वीर बाबुराव शेडमेक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!