
!राष्ट्रीय मानवाधिकार संघठन (असो.) नई दिल्ली – जिल्हा गडचिरोलीची माहिती मार्गदर्शन कार्यशाळा व बैठक संपन्न!
गडचिरोली | दि. २२ फेब्रुवारी २०२६
राष्ट्रीय मानवाधिकार संघठन (असो.) नई दिल्ली यांच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या आदेशानुसार जिल्हा गडचिरोली मानवाधिकार संघटनेच्या वतीने नवेगाव कॉम्प्लेक्स, मुरखळा येथे नवीन कार्यकारिणी बैठक तसेच संघटन माहिती मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी, शहर कार्यकारिणी अध्यक्षा भूषणाताई खेडेकर व राणीताई गोपशेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात नवेगाव-मुरखळा प्रभागातील अनेक महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थित नागरिकांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत प्रवेश देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी यांनी संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती व मानवाधिकार विषयक जनजागृती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संघटनेच्या वतीने गडचिरोली शहरातील प्रत्येक प्रभागात कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विविध सामाजिक व नागरी समस्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यशाळेत जया मडावी, प्रभा किरंगे, पायल बारसिंगे, प्रतिभा शेंडे, जयश्री कुळमेथे, वैशाली कोसरे, वंदना वाघाडे, ममता आऊतकर, हिरा मेश्राम, रविंद्र डोंगरे, पवन गोपशेट्टीवार, जयेंद्र राऊत यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








