Home गडचिरोली गडचिरोली नगरपरिषदेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न; “स्वच्छता हीच...

गडचिरोली नगरपरिषदेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न; “स्वच्छता हीच खरी सेवा” — नगराध्यक्ष अँड प्रणोती निबोंरकर यांचा संदेश

0
29

गडचिरोली नगरपरिषदेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न; “स्वच्छता हीच खरी सेवा” — नगराध्यक्ष अँड प्रणोती निबोंरकर यांचा संदेश

 

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली नगरपरिषद येथे अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाजप्रबोधन, स्वच्छता चळवळ आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणाऱ्या संत गाडगेबाबांच्या कार्याचा यावेळी कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निबोंरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. आपल्या मनोगतात त्यांनी संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. “स्वच्छता हीच खरी सेवा” हा त्यांचा विचार आत्मसात करून प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच शिक्षण, समता आणि समाजसेवेच्या मूल्यांवर चालत समाज उन्नतीसाठी कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

 

या कार्यक्रमात नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचे स्मरण करत समाजहितासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमादरम्यान संत गाडगेबाबांच्या जीवनकार्याविषयी माहिती देण्यात आली व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देण्यात आला.

 

संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध नियोजनात, उत्साही वातावरणात आणि सामाजिक जागृतीच्या भावनेत पार पडला. संत गाडगेबाबांच्या आदर्श कार्यातून प्रेरणा घेत गडचिरोली नगरपरिषद सामाजिक विकासाच्या दिशेने अधिक प्रभावी पावले उचलेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!